मुख्य सामग्रीवर वगळा

"एक होता बाप"

त्याला नेहमी त्यांची चीड यायची 
पाहिल्यावर त्यांना तिरस्कार जागायाचा 
आईशी नेहमी प्रेमाने बोलणारा 
बापाशी तिरस्काराने वागायचा II 
तिरस्काराचे कारण हि ठोस होते त्याच्याकडे 
मग बापावर त्याचे प्रेम कसे जडणार 
आई वर त्याचे प्रेम होते 
पण एक आंधळा बाप कसा आवडणार II
आईच्या हाकेवर लगेच जवळ येणारा तो 
बापाच्या हाकेने दूर पळायचा 
ह्या बापाला दूर ठेऊ शकत नाही 
हा त्रास नेहमी त्याला छळायचा II 
शाळेत हि मित्र दूर पळायचे 
एका आंधळ्याचा पोर म्हणून चिडवायचे 
असेच दिवस तो पसार करायचा 
बाप कधी सोडून जाईल ह्याचीच वाट पहायचा II 
सकाळी एकदा तो उठला झोपेतून जेव्हा 
बाप त्याच्याच बाजूला झोपला होता
त्याची आई ठार ठार रडत होती जेव्हा 
तो एकटाच मनामध्ये हसत होता तेव्हा II 
जो त्याला ह्या घरात नको होता 
तो आता कायमचा निघून गेला आहे 
आनंद त्याच्या कवेत मावत नव्हता 
जाणारा तो किती सुख देऊन गेला आहे II 
ह्याच आनंदात विचारल त्याने आईला 
बाप आंधळा असण्याचे कारण सांग ना मला 
आई मात्र त्याला पाहून स्तब्ध झाली होती 
बाळा त्याचे कारण कसे समजावू तुला II 
तरी हि त्याची जिद्द 
कारण ऐकण्याची 
जाणीवच नव्हती त्याला 
बाप नसण्याची II
आइने हि ठरवले 
त्याला सगळ काहि सांगायच 
पतिला दिलेले वचन तोडुन, 
आता काहिच नाही लपवायच II 
लहानपणी एका अपघातात जेव्हा 
तुझे दोन्हि डोळे तु गमाविले होते 
तुझ्या उज्ज्वल प्रकाशापायी 
तुझ्या बापाने स्व:तचे भविष्य अंधारिले होते II 
ऐकुन हे जीवघेण सत्य 
जणु तो बधीरच झाला होता 
जोरजोराने हसणारा तो 
आता अस्थिर झाला होता II
तिरस्कार होता बापासाठि ज्या डोळ्यात 
त्याच डोळ्यात आता अषृंचा पूर आला होता 
जेव्हा त्याला बापाची आठवण येत होती, 
तेव्हाच तो नेमका त्याच्यापासुन दुर गेला होता II
-निलेश (१५.८.१०)

टिप्पण्या