...समजलच नाय...
( मनिष.ह. सासे )
मला कधी हे समजलच नाय
; सौंदर्य वर-वरी बघत होतो
देव दगडात शोधत होतो
हृदयी अंतरात्मा सत्य होता
दुःख भावनांचे जानतच नव्हतो
मला कधी हे समजलच नाय
जगत होतो मी तिच्या सोबत
प्रेमाचे मायेने झोके घेत
आलो होतो जगती म्हणून
वारयासारख्या झेपा घेत
मला कधी हे समजलच नाय
दुःख दाटल होत तिच्या मनी
माझ्या आठ्वनिन्त जिव्हाला धरुनी
प्रेम छायेत तिच्या सोबत
मी संस्कारांत जगुनी
सत्य मुखी सांगतो देवाला
मी तिला कधी समजलोच नाय
राहिल फक्त भावनांच ओझ
समांतर रेषा कधी जुळल्याच नाय
मला कधी हे समजलच नाय
जन्म घेतला मी तिच्या पोटी
वेदना तिच्या पारखल्याच नाय
पाण्यातल्या माशांचे अश्रृ
मला कधी दिसलेच नाय
निशब्द भावनांना माझ्या
वाट माझी समजलीच नाय
काय सांगु , कसे सांगु
शब्द आता उरलेच नाय
...मनिष सासे...
(8554907176)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा