मुख्य सामग्रीवर वगळा

सांग ना… 

सांग ना…  माझी होशील का ?

पुरे झाला तुझा बहाणा… 
प्रेमात तुझ्या झालो दीवाना … 
नयनांची भाषा समजून घे ना,
हृदयाची व्यथा जाणून घे ना …!

सांग ना… 
सांग ना…  माझी होशील का ?

नेहमी तुला बघतो मात्र … 
सांगतात माझे मित्र … 
पाठव तिला प्रेम पत्र,
केव्हा संपणार तुझे हे सत्र …?

सांग ना… 
सांग ना…  माझी होशील का ?

येतेस जेव्हा स्वप्नांत तु… 
होतात किती हाल माझे … 
झोपेत बडबडतो मी तेव्हा,
सगळे खडबडून होतात जागे…!

सांग ना… 
सांग ना…  माझी होशील का ?

केव्हातरी तु म्हणशील मजला… 
तुझीच आहे मी साजणा… 
त्या क्षणांची मी वाट पहातो,
केव्हा येशील तु माझ्या अंगणा…!

सांग ना… 
सांग ना…  माझी होशील का ?

कवी - दिपक यशवंते "मैत्रेय"

टिप्पण्या