"एक होता बाप" त्याला नेहमी त्यांची चीड यायची पाहिल्यावर त्यांना तिरस्कार जागायाचा आईशी नेहमी प्रेमाने बोलणारा बापाशी तिरस्काराने वागायचा II तिरस्काराचे कारण हि ठोस होते त्याच्याकडे मग बापावर त्याचे प्रेम कसे जडणार आई वर त्याचे प्रेम होते पण एक आंधळा बाप कसा आवडणार II आईच्या हाकेवर लगेच जवळ येणारा तो बापाच्या हाकेने दूर पळायचा ह्या बापाला दूर ठेऊ शकत नाही हा त्रास नेहमी त्याला छळायचा II शाळेत हि मित्र दूर पळायचे एका आंधळ्याचा पोर म्हणून चिडवायचे असेच दिवस तो पसार करायचा बाप कधी सोडून जाईल ह्याचीच वाट पहायचा II सकाळी एकदा तो उठला झोपेतून जेव्हा बाप त्याच्याच बाजूला झोपला होता त्याची आई ठार ठार रडत होती जेव्हा तो एकटाच मनामध्ये हसत होता तेव्हा II जो त्याला ह्या घरात नको होता तो आता कायमचा निघून गेला आहे आनंद त्याच्या कवेत मावत नव्हता जाणारा तो किती सुख देऊन गेला आहे II ह्याच आनंदात विचारल त्याने आईला बाप आंधळा असण्याचे कारण सांग ना मला आई मात्र त्याला पाहून स्तब्ध झाली होती