मुख्य सामग्रीवर वगळा

प्रिये , मज रोज भास होई!

कधी सांजवेळी
पापणीला पूर येई
आठवणी ओल्या तुझ्या
दूर दूर नेई!

ओघळत्या थेंबांचे
नाजुकसे क्षण
एकेक थेंब
सारं सांगून जाई!

भिजलेल्या डोळ्यांनी
कातरवेळ टळून जाई
त्या वळणावर तुझी
रोज आठवण येई!

किनार्यावर वेचलेले
सुखद क्षण,
वेड मन माझं,
साठवून घेई!

तुझ्या माझ्या मैफिलीचा
एक नाद येई
पावले हळूच, तोच ठाव घेई

तुझ्या गोड मखमली 
स्वप्नांचा
प्रिये , मज रोज भास होई
रोज भास होई!!

                                 मैत्रेय (अमोल कांबळे )

टिप्पण्या