मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

2011 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

प्रिये , मज रोज भास होई!

कधी सांजवेळी पापणीला पूर येई आठवणी ओल्या तुझ्या दूर दूर नेई! ओघळत्या थेंबांचे नाजुकसे क्षण एकेक थेंब सारं सांगून जाई! भिजलेल्या डोळ्यांनी कातरवेळ टळून जाई त्या वळणावर तुझी रोज आठवण येई! किनार्यावर वेचलेले सुखद क्षण, वेड मन माझं, साठवून घेई! तुझ्या माझ्या मैफिलीचा एक नाद येई पावले हळूच, तोच ठाव घेई तुझ्या गोड मखमली  स्वप्नांचा प्रिये , मज रोज भास होई रोज भास होई!!                                  मैत्रेय (अमोल कांबळे )

तुझ्यामध्ये आहेत ज्या उणीवा

तुझ्यामध्ये आहेत ज्या उणीवा हसत हसत तू काबुल कर तुझ्यामध्ये आहेत ज्या जाणीवा ओरडून ओरडून त्यांना जागं कर !!!!!! झोपलं आहे तुझं जे भाग्य डोळ्यांवर पाणी ओत खडबडून त्याला जागं कर हेवा असेल प्रत्येक मनी तुझा शत्रूवरही जगावेगळं प्रेम तू कर!!!!!!! जर दिलासा शब्द तू कुणाला त्या शब्दांचा तू आदर कर शास्त्रशास्त्र पारंगत असलास जरी तू तुझ्या अमोघ शब्दांनीच शत्रूला तू पराजित कर !!!!! असेल जीवन तुझे वादळ वाऱ्यापरी असेल जीवनी तुझ्या दु:ख आभाळाएवढं असेल आयुष्य तुझं सदा संघर्षमय जीवन इतरांचं मात्र प्रकाशित कर !!!!!!!

पिंपळ

  पिंपळ Image via Wikipedia नुकतेच मुंडण केलेल्या बटूच्या डोक्याप्रमाणे गोमटेपणा मिरवणार्‍या पिंपळाने केली सुरू तपश्चर्या ... सूर्याचे पुढे ठाकलेले आव्हान झेलण्यासाठी ... तेव्हा झाली कृपा त्यावर पृथ्वी आणि जळाची ! दिसू लागली प्रभावळ त्याच्या भोवती पालवीची ! पालवी ... भूमीच्या रंगाची, पाण्यासारखी तजेलदार ! अद्वैताचा झालेला हा स्पर्श जेव्हा सांभाळू लागेल जीवन-तत्व, हिरव्या पर्णसंभारातून .. तेव्हा सूर्याचे असंख्य असह्य किरण शोषून घेत हा पिंपळ होत राहील उतराई भूमी आणि जळाप्रत त्यासाठी, त्यांनी केलेल्या कृपेतूनच देत राहील गारवा आणि आसरा रणरणत्या उन्हाच्या वैराणातही ! आणि मग करील आवाहन मेघांना .. अधिक सामर्थ्याने या दाहकतेवर जलतत्वाचे अखंड वर्षाव घडवण्यासाठी ! जीव-सृष्टीच्या कल्याणाचा एक आश्रम अविरत चालवणारा योद्धा ऋषी ... हा पिंपळ !